Monday, December 1, 2014

विदर्भात मागील दोन दिवसात आणखी ७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या: भाजप-सेनेच्या सत्ता वाटणी दरम्यान दुष्काळग्रस्त विदर्भ आणि मराठवाडा भागात शेतकरी आत्महत्यांचा पाऊस

विदर्भात मागील दोन दिवसात  आणखी ७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या: भाजप-सेनेच्या सत्ता वाटणी दरम्यान दुष्काळग्रस्त विदर्भ आणि मराठवाडा भागात  शेतकरी आत्महत्यांचा पाऊस  
४ डिसेंबर २०१४ 
एकीकडे शिवसेना भाजपशी सत्ता समीकरणात जास्तीत जास्त मंत्रिपद पदरात पाडून 'शिवशाहीचा ' सुतोवात करीत होती त्याच वेळी मागील विदर्भात ४८ तासात ७  दुष्काळग्रस्त उपासमारीला तोंड देत असलेले मदतीची आस संपलेले शेतकरी आपली जीवन यात्रा आत्महत्या संपवीत होते या  नापिकीग्रस्त शेतकऱ्यांमध्ये अमरावतीचे घाटलाड्गीचे  संदीप  नागले ,चमकचे सुरेंद्र निकम चेटकपुरचे  प्रभाकर भोसले ,यवतमाळ येथील बाम्ह्रडाचे   शैलेश  खरे ,अकोला येथील राम्पापुरचे  कृष्णा मडावी ,वाशिमचे  वाईगौड  गावचे  राजू टोंगे तर भंडारा येथील बपेराचे  अप्पाजी निनावे यांचा समावेश आहे याच दरम्यान महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त  मराठवाडा भागात १२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे वृत्त समोर आले ,विदर्भात या वर्षी १०४८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून केंद्र व राज्य सरकारने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याने या आत्महत्या होत असल्याचा आरोप विदर्भ जनांदोलन समितीचे नेते किशोर तिवारी यांनी केला आहे. 
मागील २ व ३ डिसेंबरला आपण दिल्लीयेथे केंद्रीयमंत्री  नितीन गडकरी ,हंसराज अहिर यांना भेटून तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना  निवेदन देऊन  महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचे   सुमारे ५० लाख हेक्टर वरील नगदी पिक कापुस व सोयाबीन  सम्पूर्ण नापिकी झाल्यानंतर व आलेल्या पिकला हमीभावापेक्षा कमी मिळत असल्यामुळे तसेच सतत दोन महिन्यापासून  ओरड करूनही  सादी  दखलही अधिकारी घेत नसल्यामुळे  सारा महाराष्ट्र हेलावून निघाला आहे त्यातच केंद्र व राज्य सरकारने बध्याची  भुमिका घेतली  शेतकऱ्यांचे एकूण पिकांचे नुकसान ५० हजार कोटीचे झाले असतांना महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारला फक्त साडे चार हजार कोटीची मदत मागितली असुन ही फारच अपुरी असुन महाराष्ट्राचे या वर्षीचे कृषी संकट अभुतपूर्व असुन या करीता कमीतकमी ६० हजार कोटीचे  विषेय पकेज देणे काळाची गरज असुन   भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विदर्भात यावे अशी विनंती  विदर्भ जनांदोलन समितीचे नेते किशोर तिवारी केंद्र सरकारला केली आहे . 
आपल्या मागणी पत्रात  सरकारने दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना प्रति हेक्टरी २५ हजार रुपये सरसकट अनुदान द्या, संपूर्ण शेतकर्‍यांना कर्जमाफी व नव्याने पीककर्ज देण्याची योजना लागू करा, सर्व उपासमारीला तोंड देत असलेल्या गावातील शेतकरी व शेतमजुरांना अंत्योदय योजना तत्काळ लागू करा, सर्व शेतकर्‍यांना रोजगार हमी योजनेमधून १०० दिवस प्रति एकरी अनुदान द्या, सर्व दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना व शेतमजुरांना मोफत आरोग्य सुविधा, शिक्षण सुविधा व मुलीच्या लग्नासाठी अनुदान द्या आदी मागण्याही तिवारी यांनी केल्या आहेत.

No comments: