Friday, December 12, 2014

केंद्रात विदर्भवादी गडकरी व अहिर तर राज्यात फडणवीस,मूनगट्टीवार व बावनकुळे सत्ताकेंद्र असतांना वेगळ्या विदर्भाच्या मागणीपेक्षा विदर्भा ५५ वर्षाचा अन्नाय दुर करण्यासाठी विदर्भवाद्यांनी लढा द्यावा

केंद्रात विदर्भवादी गडकरी व अहिर तर राज्यात फडणवीस,मूनगट्टीवार व बावनकुळे सत्ताकेंद्र असतांना वेगळ्या विदर्भाच्या मागणीपेक्षा विदर्भा ५५ वर्षाचा अन्नाय दुर करण्यासाठी  विदर्भवाद्यांनी लढा द्यावा 

दिनांक -१३ डिसेंबर २०१४
वेगळ्या विदर्भ राज्याची निर्मितीचा सत्ताआल्यानंतर वारंवार संकल्प मोकळ्या मानाने मांडणारे भाजप  विदर्भवादी  नेते नितीन गडकरी ,हंसराज अहीर ,देवेंद्र फडणवीस ,सुधीर मूनगट्टीवार,चंद्रशेखर बावनकुळे हे केंद्रात व राज्यात सत्तेच्या केंद्रस्थानी आल्यामुळे विदर्भाच्या महाराष्ट्रात विलय झाल्यानंतर पश्चिम महाराष्ट्राने केलेला ५५ वर्षाचा अन्नाय व विकासाचा अनुशेष महाराष्ट्र राज्याच्या वार्षिक  १ लाख ६० हजार रुपयाच्या आमदनीमधुन करण्याची आलेली संधीचे सोने करण्यासाठी सर्व विदर्भवादी नेत्यांनी या नेत्यांच्या पाठीशी ऊभे राहून गरज वाटल्यास कानपिचक्या घेऊन येणारे चार वर्ष विकासाची चळवळ राबवावी व शेवटच्या पाचव्या वर्षी विदर्भ राज्याचा लढा रेटावा अशी विनंती मागील सहा महीन्यापासून भाजपला आश्वासनाची आठवण करून देत  विदर्भाच्या निर्मितीचे लढा करणाऱ्या नेत्यांना ,विदर्भ राज्य निर्मितीसाठी भाजपला लोकसभा व विधानसभेत पाठींबा देणारे विदर्भ जनआंदोलन समितीचे नेते किशोर तिवारी केली आहे .

आज विदर्भाचे कृषी संकट ,बेरोजगारी , आदिवासींची उपेक्षा व  उद्योगाची वाताहत यांनी एक गंभीर स्वरूप धारण केले आहे मात्र देवाच्या कृपेने मागील सहा महीन्यात सारे सत्ता समीकरण बदलले असुन राज्यात मुख्यमंत्री ,अर्थमंत्री व उर्जामंत्री सह केंद्रात गडकरी व अहिर या सारखे विदर्भासाठी लढा देणारे व विदर्भाच्या अनुशेष दुर करण्यासाठी मागील २० वर्षापासुन संघर्ष करणारे नेतेच सत्ता केंद्रात आले आहेत त्यांनी भारताच्या व महाराष्ट्राच्या निधिमधुन विदर्भाच्या शेतकऱ्यांचे ,आदिवासींचे व बेरोजगाराचे प्रश्न मार्गी लावण्याकरिता सर्व विदर्भ हितचिंतकांनी सहकार्य करावे अशी रंजल्यागांजल्या विदर्भाच्या जनतेची अपेक्षा मात्र काही नेते आतच्याआत सांगितले म्हणून वेगळा करा असा आग्रह धरीत त्यांच्या घरावर जात आहेत यामुळे विदर्भाच्या विकासाचे व जनतेच्या कल्याणाचे आंदोलन जनाधार गमावत आहे ,अशी खंतही तिवारी यांनी व्यक्त केली . 
मागील लोकसभेत व आतच्या विधानसभेच्या निवडणुकीत या विदर्भवादी नेत्यांनी विदर्भाच्या  मुद्यावर निवडणूक लढविली मात्र जनतेनी त्यांना नाकारले आहे व विदर्भाच्या प्रश्नांवर त्यांनी घोषीत केलेला एकाधीकारही नाकारला आहे अशा विपरीत वातावरणात आपण जनतेच्या जनादेशाचा आदर करावा व   विदर्भवादी  नेते नितीन गडकरी ,हंसराज अहीर ,देवेंद्र फडणवीस ,सुधीर मूनगट्टीवार,चंद्रशेखर बावनकुळे यांना सोबत घेऊन पहिले चार वर्ष भारताची व महाराष्ट्राची तिजोरी रीकामी करून विदर्भाचा विकासाचा अनुषेय पुर्ण करावा कारण आज शेतकऱ्यांना सिंचन व विदर्भातील पुणे -मुंबई सारख्या  ठिकाणी रोजगार करणाऱ्यांना मिहान सारख्या ठिकाणी  तात्काळ नौकरी पाहीजे , आदिवासींची उपासमार व कूपोषण यावर तात्काळ तोडगा पाहिजे व आज केंद्रात व राज्यात न्याय देणारे सत्तेत आल्यावर द्याना वेळ देणे काळाची गरज म्हणून सर्व विदर्भवाद्यांनी आता विदर्भवादी  नेते नितीन गडकरी ,हंसराज अहीर ,देवेंद्र फडणवीस ,सुधीर मूनगट्टीवार,चंद्रशेखर बावनकुळे यांना साथ द्यावी अशी विनंती ,किशोर तिवारी यांनी केली आहे .      

No comments: