Wednesday, December 10, 2014

शेतकऱ्यांना पैकेज नाही पीक कर्जमाफी व वाढीव हमिभावाचे आश्वासन पुर्ण करा:१२ आत्महत्या झालेल्या यवतमाळच्या देहली येथे उद्या ११ डिसेंबरला युतीच्या वचननाम्याची होळी करणार

शेतकऱ्यांना पैकेज नाही पीक कर्जमाफी व  वाढीव हमिभावाचे आश्वासन पुर्ण करा:१२ आत्महत्या झालेल्या यवतमाळच्या देहली  येथे युतीच्या वचननाम्याची  होळी करणार 
दिनांक - १० डिसेंबर २०१४
 मागील दहा वर्षात शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सुमारे २० हजार कोटींचे २००५ पासूनचे  देण्यात आलेले  सर्व पैकेज अधिकारी ,ठेकेदार व राजकीय नेत्यांनीच खाल्याने आम्हाला पैकेज वा बोनसचा गजर देऊ नका तर   महाराष्ट्राच्या युती सरकारने केंद्रात व राज्यात सत्ता प्राप्तीसाठी दिलेले वचन पुर्ण करण्यासाठी नापिकीचे प्रती हेक्टरी अनुदान ,संपुर्ण पीक कर्जमाफी व  पंतप्रधान नरेंद्र  मोदी यांच्या  फार्मुल्याप्रमाणे  लागवड  खर्च अधिक ५० टक्के नफा असा हमीभाव कापसाला ,सोयाबीनला ,तुर व धानाला द्या या मागणीसाठी यवतमाळच्या  पैकेज नंतर सतत नापिकी व कर्जाला बेजारून  १२ शेतकऱ्यांनी  आत्महत्या केल्या  त्या दहेली या  गावी उद्या  ११ डिसेंबरला   रोजी  युतीच्या पीक कर्जमाफी व  वाढीव हमिभावाचे आश्वासनाच्या  वचननाम्याची  होळी करून सरकारचे शेतकऱ्यांच्या  मागण्याकडे  लक्ष वेधण्या  प्रयास करण्याची घोषणा विदर्भ जन आंदोलनाचे नेते किशोर तिवारी  केली आहे . 
भाजपच्या किसान आघाडीचे नेते  जयकुमार चौधरी यांनी  दिलेल्या माहिती प्रमाणे  मागील पाच वर्षात  दहेली या गावात  आर्थिक अडचणीत आलेला व पैकेज पासुन वंचित असलेल्या १२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असुन  दोन दिवसापूर्वी बापा  पाठोपाठ पुत्रांनी  आत्महत्या केल्यानी सारे परीसर  संपूर्ण कुटुंब रस्त्यावर आल्यामुळे  एका मोठ्या धक्क्यातून जात असुन दुष्काळग्रस्त शेतकऱ्याची  उपासमार होत असतांना सरकार  अन्नाचीही मदत करीत नसुन सरकारने पाहणी व अहवाल बाजूला ठेऊन शेतकऱ्यांना  वाचविण्यासाठी तात्काळ मदत द्यावी अशी जोरदार मागणी होत आहे  दहेली या गावात  दोन दिवसापूर्वी  मोरेश्वर चौधरी यांनी  आपले वडील  भारत चौधरी यांचा मार्ग धरत आत्महत्या केली असून या पुर्वी  संताची  मानकर व  घनश्याम मानकर या पिता पुत्रांनी आत्महत्या केल्या असुन एकट्या दहेली गावात  यांच्या शिवाय  अनंत इंगोले , नानाजी  चौधरी , विनायक बोंद्रे , पुंडलिक  वानखेडे , गजानन एलादे , देविदास मेश्राम , विलास आडे , पांडुरंग आडे  सह  अनंत इंगोले यांच्या घरच्या सुनबाईने सुद्धा  नैरायापोटी आत्महत्या केली असुन  गावात शेतकरी तर सोडा आता शेतमजूरही आत्महत्या करीत असुन कोणीही   यांचा वाली नाही अशी  खंत जयकुमार चौधरी यांनी  यावेळी मांडली . 
उद्या  ११ डिसेंबरला   रोजी आश्वासनाच्या  वचननाम्याची  होळी करून सरकारचे शेतकऱ्यांना दुष्काळग्रस्त शेतकर्याना प्रति हेक्टरी २५ हजार रुपये सरसकट अनुदान , संपूर्ण शेतकर्‍यांना कर्जमाफी व नव्याने पीककर्ज देण्याची योजना लागू केली नाही वं सर्व उपासमारीला तोंड देत असलेल्या गावातील शेतकरी व शेतमजुरांना अंत्योदय योजना तत्काळ लागू केली नाही, सर्व शेतकर्‍यांना रोजगार हमी योजनेमधून १०० दिवस प्रति एकरी दिले नाही तसेच  सर्व दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना व शेतमजुरांना मोफत आरोग्य सुविधा, शिक्षण सुविधा व मुलीच्या लग्नासाठी अनुदान तात्काळ द्यावे ह्या मागण्या पुन्हा एकदा सरकारकडे देण्यात येतील अशी माहीती किशोर तिवारी यांनी यावेळी दिली 

No comments: