Wednesday, December 17, 2014

महाराष्ट्राचे अभूतपूर्व 'कृषी संकट ' राज्याचा 'तोटका अहवाल 'तर केंद्राच्या चमुचे 'पाहणी थोतांड ' हितर शेतकऱ्यांची थट्टाच -किशोर तिवारी

महाराष्ट्राचे अभूतपूर्व 'कृषी संकट ' राज्याचा 'तोटका अहवाल 'तर केंद्राच्या चमुचे  'पाहणी थोतांड ' हितर  शेतकऱ्यांची  थट्टाच -किशोर तिवारी 
दिनाक - १७  डिसेंबर २०१४
ज्या यवतमाळ जिल्यात सर्वात जास्त शेतकरी रोज आत्महत्या करीत आहेत त्या जिल्यात  दुपारपासून हजारो शेतकरी होते  दुष्काळाची पाहणी करण्यासाठी  आलेल्या बहूचर्चीत केंद्रिय  पथकाने शेतकर्‍यांना वाकुल्या दाखवित निघून  गेल्याने  तर   अनेक ठिकाणी दहा मिनिटात तर अनेक ठिकाणी  रात्रीच्या अंधारात केलेल्या 'पाहणी तमाशा '  ६० लाख हेक्टर मधील सुमारे २५ हजारावर खेड्यातील तीन कोटीच्यावर ग्रामीण जनतेला उपासमारीच्या दारावर नेणाऱ्या  अभुतपूर्व अस्मानी व सरकारी शेतकरीविरोधी धोरणामुळे आलेल्या  संकटावर  महाराष्ट्र सरकारने सादर केलेल्या ३९६० कोटी रुपयाच्या  मदतीच्या मागणीच्या अहवालानंतर  नव्याने केलेली थट्टा असून राज्य सरकार सोबत आता केंद्र सरकारही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार  का असा सवाल शेतकरी नेते  किशोर तिवारी सरकारला विचारला आहे . 
केंद्र सरकारच्या चमुमधील बहुतेक अधिकारी कोरडवाहू  शेतीचा व दुष्काळप्रवरण भागाच्या कृषी संकटाचा अभ्यास  नसणारे  सांगकाम्या स्वरूपाचे  'पाहणीचे नाटक ' सुपरफास्ट गतीने करून कोट्यावधीचा चुना सरकारी तिजोरीला लाऊन शेतकऱ्यांची थट्टा करून निघुन गेले आहेत राज्य सरकारने  ४२ लाख हेक्टर मधील  नगदी पिक  कापुस व सोयाबीन तर १८ लाख हेक्टर मधील तुर ,धान ,उस , फळ  बागायतीचे  झालेली अभूतपूर्व नापिकी व निसर्गाच्या माऱ्यामुळे झालेले नुकसान ५० हजार कोटीचे स्वत्ताच  आखल्याने फक्त ३९६० कोटी रुपयाच्या  मदतीच्या मागणीचा प्रस्ताव केंद्राला देणे व केंद्राची चमु येण्यापुर्वीच ७ हजार कोटीचे पैकेज घोषीत करणे हा सगळा प्रकार  नौकरशाहीचा  नंगानाज असून  राज्याचा तीन कोटी दुष्काळग्रस्त जनतेला  सरकार कशी मदत करणार असा सवालही तिवारी केला आहे . 
आपण  केंद्र सरकारला  महाराष्ट्राच्या अभूतपूर्व अशा कृषी संकटावर  निवेदन देऊन  राज्यातील ३ कोटी    शेतकरी शेतमजूर  वाचविण्यासाठी व या कोरडवाहु शेतकऱ्यांना मदतीचा हात देताना खालील मागण्या सादर केल्या आहेत 

-कोरडवाहु शेतकऱ्यांच्या  प्रमुख मागण्या 
१.सर्व दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी वीस हजार रुपये सरसकट नुकसान भरपाई वा मदत देणे 
२. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या सात-बारा कोरा करणे 
३. कोरडवाहु शेतकऱ्यांना रोजगार हमी योजनेमधून प्रती हेक्टरी १०० दिवसाची मजुरी सरळ अनुदान रूपाने देणे 
४. कापूस -सोयाबीन   - धानासाठी  राष्ट्रीय शेतकरी आयोगाच्या शिफारशी प्रमाणे लागवड खर्च अधिक ५० % नफा  असा हमीभाव द्या . 
५-सर्व आदिवासीना तात्काळ  अन्न  सुरक्षा व  खावटी देणे   
दुष्काळग्रस्त आदिवासी  शेतकऱ्यांच्याना व शेतमजुरांना सरसकट  अंत्योदय योजने नुसार अन्न सुरक्षा व  खावटी वाटप  करा . 
६- आरोग्य सेवा 
सर्व दुष्काळग्रस्त  शेतकऱ्यांच्याना व शेतमजुरांना २०१३ च्या यादी नुसार बी पी  एल चे  कार्ड देऊन मोफत वैद्दकिय सेवा  सर्व दवाखान्यात मोफत देणे 
७..सर्व दुष्काळग्रस्त  शेतकऱ्यांच्याना व शेतमजुरांनावृद्धाना व विधवा  मासीक अनुदान -सर्वदुष्काळग्रस्त  शेतकऱ्यांच्याना व शेतमजुरांना शेतकरी विधवा ,परितक्त्या महिलांना दरमहा कमीतकमी हजार रुपये मासीक अनुदान व सरकारी नौकर सारखे प्रत्येक महीन्याला १ तारखेला बँकेतून देण्याची योजना दया ,अशी माहिती किशोर तिवारी यांनी दिली  यावेळी दिली .
--------------------------------------------------------
----
---

No comments: