Sunday, December 14, 2014

युती सरकारच्या फुसक्या पैकेजच्या धक्क्याने विदर्भात आणखी १२ शेतकऱ्यांच्या आत्महत्या :शासनाने शब्द फिरविल्याने शेतकरी आत्महत्येत वाढ...

युती सरकारच्या फुसक्या पैकेजच्या  धक्क्याने विदर्भात  आणखी  १२ शेतकऱ्यांच्या  आत्महत्या :शासनाने शब्द फिरविल्याने शेतकरी आत्महत्येत वाढ

दिनाक -१४ डिसेंबर २०१४
 भाजप -शिवसेनेच्या युती सरकारने लोकसभा व विधानसभा निवडणुकीत सातबारा कोरा करणे व लागवड खर्च अधिक ५0 टक्के नफा असा हमीभाव देण्याचे आश्‍वासन दिले होते. आता त्यांनी शब्द फिरविला असून तिजोरी खाली असल्यामुळे ते शक्य नाही   आश्‍वासनापैकी एकाही गोष्टीची जाहीर केलेल्या पैकेजमध्ये पूर्तता केल्याने व यामुळे विश्‍वासघाताच्या धक्याने निराशेच्या गर्तेत असलेला शेतकरी मोठय़ा प्रमाणात आत्महत्या करत आहे. मागील चार दिवसात  दुष्काळग्रस्त विदर्भात १२ शेतकर्‍यांनी आत्महत्या केली आहे. 
१.  शंकर चौधरी रा. साखरादरा (यवतमाळ)
२. दिनेश जैस्वाल रा. कोथळी (यवतमाळ)
३. जगन  चव्हाण रा . भिवापूर (अमरावती )
४. बंडू दहाळकर रा. वोठोना बाजार (यवतमाळ)
५. दिपक  झाडे रा. पहलानपुर (वर्धा )
६. राजु पवार रा. वरणदली (यवतमाळ)
७. संजय थोरात रा. एडसी (वाशीम)
८. शैलेश भोभाटे रा. खापरी (वर्धा )
९. तुळसाबाई मून रा . पारडी (यवतमाळ)
१०. सुरज भोयर रा. अंजी (यवतमाळ)
११.  तुकाराम चव्हाण रा.  भोपापूर (यवतमाळ)
१२. सचिन राउत रा. शिरजगाव (अमरावती )
यावर्षी विदर्भात १ हजार ७२ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. मस्तवाल अधिकारी शेतकर्‍यांच्या अडचणीची माहिती सरकारला देत नसल्यामुळे सरकार मदतीला विलंब करीत असल्याचा आरोप विदर्भ जनांदोलन समितीचे नेते किशोर तिवारी यांनी केला.
 पिक कर्ज माफी व आर्थिक अनुदान हा शेतकरी आत्महत्या रोखण्याचा  तोडगा नसून फक्त पैकेज वर आणखी एक केंद्राचे पैकेज दया अशी  असा रेटा महाराष्ट्राच्या  अधिकार्‍यांनी लावून नवीन सरकारला पटवून दिल्याने सरकारने   केंद्राकडे तसाच पाठपुरावा करण्यात येणार असुन युती शासनाची हीच  भूमिका शेतकरी आत्महत्याना आमंत्रण देत  असल्याचा आरोप  नेते किशोर तिवारी यांनी केला आहे. 
ज्या १२ शेतकर्‍यांनी मागीलचार दिवसात आपली जीवनयात्रा संपविली त्यांची ओळख व तपशील माध्यमांनी असा दिला आहे ...  राळेगाव तालुक्यातील वोठोना बाजार येथील  अल्पभूधारक शेतकरी बंडू विठोबा डहाळकर (५०) यांच्याकडे तीन एकर कोरडवाहू शेती आहे. सततच्या नापिकीमुळे बँकेचे ५० हजार व सावकाराचे ६० हजार रुपयांचे कर्ज होते. त्यातच डोक्यावर दोन मुलींच्या लग्नाची जबाबदारी असल्याने ते चिंतातूर होते. यातून कुठलाही मार्ग दिसून न आल्याने बंडू यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. दिग्रस तालुक्यातील वरणदळी येथील हाजूसिंग रामचंद्र पवार (५८) यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. खरिपात केलेला खर्चही परत न मिळू शकल्याने हाजूसिंग संकटात सापडले होते.अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील भिवापूर येथील शेतालगतच्या झाडाला गळफास घेऊन जगन किसनराव चव्हाण (५८) यांनी आत्महत्या केली. ही घटना शनिवार १३ डिसेंबर रोजी उघडकीस आली. अवघी दीड एकर शेती, त्यावर बँकांचे कर्ज, खासगी सावकारांचे कर्ज. मक्त्याने १0 एकर शेती केली. त्यामधील सोयाबीनची पावसाअभावी कापणीच केली नाही. मक्तेदारांचा पैशासाठी तगादा, उपवर मुलगी, अन्य चार मुली आणि पत्नीसह जगावे कसे, या विवंचनेत जगन चव्हाण होते. त्यांनी १0 एकर शेती मक्त्याने घेतली होती. यासाठी इंडियन बँकेचे ५0 हजाराचे कर्ज काढले. खासगी सावकारांचे कर्ज होतेच.यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील साखरा (दरा) येथील शंकर उद्धव चौधरी या ३८ वर्षीय शेतकर्‍याने विष प्राशन करून आत्महत्या केली. शंकरने १0 डिसेंबरला सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घरी कुणीच नसल्याचे बघून विष प्राशन केले. याबाबत माहिती मिळताच त्यांना कुटुंबीयांनी वणी येथील एका खासगी रूग्णालयात दाखल केले. तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ३५ हजार रूपयांचे कर्ज होते. बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील कोथळी येथील अल्पभूधारक शेतकरी दिनेश शंकरलाल जैस्वाल (३८) यांनी नापिकी व कर्जाला कंटाळून १३ डिसेंबर रोजी विषारी द्रव प्राशन करुन आत्महत्या केली. त्यांच्याकडे २ हेक्टर शेती होती.त्यांच्यावर जिल्हा केंद्रीय बँकेचे २0 हजार रूपयांचे कर्ज होते. या विवंचनेतून त्यांनी विषारी द्रव सेवन केले. त्यांना बुलडाणा येथील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र दोन दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर १३ डिसेंबर रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. सततची नापिकी, वाढता कर्जबाजारीपणा, बाजारपेठेत कृषी मालाचे पडलेले भाव व सरकारकडून पॅकेजच्या नावावर झालेल्या निराशेने शेतकऱ्यांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे. यातून गेल्या २४ तासात दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. यात राळेगाव व दिग्रस तालुक्यातील शेतकऱ्यांचा समावेश आहे.

सरकारने दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना प्रति हेक्टरी २५ हजार रुपये सरसकट अनुदान, संपूर्ण कर्जमाफी व नव्याने पीककर्ज देण्याची योजना लागू करावी, शेतकरी व शेतमजुरांना अंत्योदय योजना, शेतकर्‍यांना रोजगार हमी योजनेमधून १00 दिवस प्रति एकरी दिले नाही तसेच सर्व दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना व शेतमजुरांना मोफत आरोग्य सुविधा, शिक्षण सुविधा व मुलीच्या लग्नासाठी अनुदान तात्काळ दिले नाही. त्यामुळेच दिवसाला पाच शेतकरी आत्महत्या करीत आहेत असे किशोर तिवारी यांनी सांगितले. 
-------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------
---------






No comments: