Wednesday, December 24, 2014

नागपूर मध्ये 'आयआयएम' च्या फडणवीस सरकारच्या घोषणेचे विदर्भ जनांदोलन समितीकडून स्वागत

 नागपूर मध्ये 'आयआयएम' च्या  फडणवीस सरकारच्या घोषणेचे  विदर्भ जनांदोलन  समितीकडून स्वागत
दिनांक -२४ डिसेंबर २०१४

विदर्भ जनांदोलन समितीने नागपूर येथे महाराष्ट्राचे पहिले  'आयआयएम' सुरु करण्याच्या घोषणेचे स्वागत केले असुन मागील ६० वर्षांपासून विदर्भावर होत असलेल्या अन्नाय व उपेक्षाच्या आता अंत होण्याची सुरवात म्हणावी लागेल  अशी प्रतिक्रिया विजसचे नेते किशोर तिवारी यांनी या घोषणेवर आनद व्यक्त केली . 
नागपुर हे भारताच्या सर्व राज्यांना जोडणारे देशाच्या मध्यस्थानी अत्यंत उपयुक्त असलेले सर्व क्षेत्रातले राष्ट्रीय  संस्था  या आधीच सुरु करण्याची गरज होती मात्र विदर्भ व नागपूरच्या उपक्षेमुळे हे होऊ देण्यात आले नाही आता केंद्रामध्ये नितीन गडकरी व राज्यात देवेंद्र फडणवीस असल्यामुळे आता दर्जेदार आंतरराष्ट्रीय स्तराच्या राष्ट्रीय  संस्था नागपूरला येत्या वर्षात येतील असा आशावादही किशोर तिवारी यांनी व्यक्त केला . 
मागील काही नागपूर व विदर्भ उच्चप्रतीचे मानवी संसाधन कच्चा माल एक कारखाना  झाले आहे मात्र  नागपुरात  व विदर्भात उद्योग नसल्यामुळे हे सर्व युवक  मुंबई पुणे पश्चिम महाराष्ट्र, गुजरात व भारतातील अन्य भागात उद्योगांना पुरविले जात आहेत आता केंद्रामध्ये नितीन गडकरी व राज्यात देवेंद्र फडणवीस असल्यामुळे हे लाखो युवक नागपूरसह विदर्भात लवकरच परतण्यासाठी त्यांना योग्य संधी मिळतील असा आशावादही तिवारी यांनी व्यक्त केला .  
विदर्भावर महाराष्ट्राने मागील ६० वर्षात केलेला सतत अन्नाय व उपेक्षा याची जाणीव ठेऊन  नितन गडकरी व देवेंद्र फडणवीस यांनी आम्हला दिलासा द्यावा अशी विनंती तिवारी यांनी केली आहे .


No comments: