पिककर्ज वाटप व कर्जाची पुनर्गठन यासाठी १८ सप्टेंबरला घाटंजी येथे "मागेल त्याला पिककर्ज " मेळावा
दिनांक -१७ सप्टेंबर २०१९
दुबार पेरणी व आता ओला दुष्काळ यामुळे घाटंजी तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना रिसर्व बँकेने मागील २७ ऑगस्टला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर दुष्काळग्रस्त तालुक्यात व मंडळात मागील वर्षाच्या खरीप हंगामाचे सर्व शेतकरयांचे परवानगी घेऊन पुर्नगठन करण्याचे आदेश सर्व सरकारी बँकांना दिले असुन राज्य अग्रीम बँकर्स समिती एस एल बी सी ने सर्व बँकांना आपल्या सर्व बँकांच्या शाखांना तसे आदेश देण्याचे आदेश दिले आहेत त्याचा फायदा अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना व्हावा यासाठी स्टेट बँक ,महाराष्ट्र बँक ,ग्रामीण बँक व मध्यवर्ती बँकेने विषेय "मागेल त्याला पिककर्ज " मेळावा १८ सप्टेंबर दुपारी १ वाजता घाटंजी येथील स्टेट बँकेत आयीजीत केला आहे ,या मेळाव्यात शेतकरी नेते किशोर तिवारी सह बँकेचे सर्व अधिकारी उपस्थित राहणार आहेत अशी माहीती या पीककर्ज मेळाव्याचे संयोजक मोरेश्वर वातीले व आदीवासी नेते अंकित नैताम यांनी केली आहे .
२०१७ पासुन छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकारने ५० लाख कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या खात्यात सुमारे २६ हजार कोटी रुपये रक्कम भरल्यानंतरही जेमतेम २० टक्के शेतकऱयांना सरकारी बँकांनी नवीन पीककर्ज दिले असल्याची तक्रार सुद्धा यावेळी आली आहे अशा बॅंकग्रस्त शेतकऱ्यांनी यावेळी यावे असे आव्हान किशोर तिवारी यांनी केले आहे .
सायतखर्डा येथे वीज ग्राहक तक्रार निवारण मेळावा
घाटंजी विभागातील ग्रामीण क्षेत्रात वीज पुरवडा फारच खंडित रहात असल्यामुळे जनतेच्या प्राचीन तक्रारी आहेत त्यांचे निवारण करण्यासाठी १८ सप्टेंबर दुपारी ३ वाजता सायतखर्डा येथे वीज ग्राहक तक्रार निवारण मेळावा वीज वितरण कंपनीने आयोजित केला आहे या मेळाव्याला शेतकरी नेते किशोर तिवारी ,वीज वितरण अधिकारी मडावी साहेब व वैद्य साहेब उपस्थित राहणार आहेत तरी घाटंजी विभागातील ग्रामीण क्षेत्रातीळ जनतेनी या वीज ग्राहक तक्रार निवारण मेळाव्याचा फायदा घ्यावा अशी विनंती मेळाव्याचे संयोजक मोरेश्वर वातीले व आदीवासी नेते अंकित नैताम यांनी केली आहे .
==================================================================
No comments:
Post a Comment