Monday, September 9, 2019

परवानाधारक सावकारांनी परवाना क्षेत्राच्या बाहेरील शेतकर्‍यांना कर्जेमाफीचे स्वागत किशोर तिवारी कडून


परवानाधारक सावकारांनी परवाना क्षेत्राच्या बाहेरील शेतकर्‍यांना कर्जेमाफीचे स्वागत किशोर तिवारी कडून 
दिनांक १० सप्टेंबर २०१९
परवानाधारक सावकारांनी परवान्यात नमूद केलेल्या क्षेत्राच्या बाहेरील शेतकर्‍यांना दिलेली कर्जे माफ करण्याचा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाच्या निर्णयाचे स्वागत कै वसंतराव नाईक शेती स्वालंबनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केले हा  निर्णय  विदर्भ आणि मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त भागातील  शेतकर्‍यांसाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.विदर्भ व मराठवाड्यातील शेतकर्‍यांना सावकारीच्या तावडीतून मुक्त करून शेतकर्‍यांना दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. परवानाधारक सावकारांनी परवान्यात नमूद केलेल्या क्षेत्राच्या बाहेरील शेतकर्‍यांना दिलेली कर्जे माफ करण्याचा निर्णय दिनांक ९ सप्टेंबरच्या  झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे यासाठी सावकार मुक्ती प्रणेते प्रकाश पोहरे ,आमदार समीर कुणावर यांनी विषेय प्रयन्त केले आहे 
 वर्धा जिल्ह्यातील शेतकरी लगतच्या नागपूर जिल्ह्यतून सावकारी कर्ज घेत असतात तसेच वाशीम बुलढाणा 
जिल्यातील शेतकरी लगतच्या अकोला  जिल्ह्यतून सावकारी कर्ज घेत असतात ते सर्व हजारो शेतकरी या कर्जमाफी पासुन वंचित होते आता त्यांनाही या योजनेचा फायदा मिळणार आहे 
विविध नैसर्गिक आपत्तीग‘स्त शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी विदर्भ व मराठवाड्यातील शेतकर्‍यांनी परवानाधारक सावकारांकडून घेतलेली कर्जे माफ करण्याचा निर्णय राज्य शासनाने एप्रिल २०१५ मध्ये घेतला होता. या निर्णयानुसार १९ जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समित्यांची स्थापना करण्यात आली होती. या समितीच्या मंजुरीनुसार ३१ मार्च २०१८  पर्यंत ४६ हजार ७३५ शेतकर्‍यांची ५५ कोटी ९६  लाख ६५  हजार रुपयांची मुद्दल आणि १०  कोटी ५९ लाख ७३  हजार रुपयांचे व्याज असे एकूण ६६ कोटी ५६ लाख ३८ हजार रुपयांचे कर्ज माफ करण्यात आले आहेत. ही रक्कम संबंधित शेतकर्‍यांच्या कर्जापोटी १३९३  सावकारांना वितरित करण्यात आली आहे.
 
या योजनेची अंमलबजावणी करताना १०  एप्रिल २०१५  च्या शासन निर्णयातील अट क्र. १ (३ ) नुसार परवानाधारक सावकाराने त्याच्या परवाना क्षेत्राबाहेरील व्यक्तीला दिलेले कर्ज अपात्र ठरले. त्यानुसार तालुका आणि जिल्हास्तरीय समित्यांनी कर्जदार शेतकर्‍यांच्या प्राप्त याद्यांच्या आधारावर कार्यक्षेत्राच्या बाहेर राहणार्‍या शेतकर्‍यांना अपात्र ठरविले होते. अशा कर्जदार शेतकर्‍यांना सावकारी कर्जमाफी योजनेचा लाभ देण्यासाठी कार्यक्षेत्राची अट एक वेळेस शिथिल करण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले होते. त्यानुसार एप्रिल २०१५ च्या शासन निर्णयातील परवानाधारक सावकाराने परवान्यात नमूद केलेल्या क्षेत्राच्या बाहेरील व्यक्तीस दिलेले कर्ज या योजनेत पात्र राहणार नसल्याची अट शिथिल करण्यास आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. त्यामुळे परवानाधारक सावकाराने परवान्यात नमूद केलेल्या क्षेत्राच्या बाहेर राहणार्‍या कर्जदार शेतकर्‍यास दिलेले ३० नोव्हेंबर २०१४  पर्यंतचे कर्ज वैध ठरणार आहे. तसेच याद्यांच्या तपासणी किंवा पुनर्तपासणीनंतर मूळ योजनेच्या इतर सर्व अटी व शर्तींप्रमाणे योग्य असणार्‍या शेतकर्‍यांच्या प्रकरणास योजनेचा लाभ मिळणार आहे तरी सर्व पात्र शेतकऱ्यानी तात्काळ लाभ घ्यावा असे आव्हान किशोर तिवारी यांनी केले आहे . 
 
आजच्या निर्णयानुसार अट शिथिल केल्यामुळे मूळ याद्यांमध्ये समाविष्ट कार्यक्षेत्राच्या बाहेरच्या अपात्र ठरविण्यात आलेल्या कर्जदार शेतकर्‍यांच्या प्रकरण तपासणी किंवा फेरतपासणीनंतर जिल्हास्तरीय समितीने ज्या तारखेला कर्जमाफी प्रस्तावास मान्यता दिली आहे, त्या तारखेपर्यंत सावकारास कर्ज व त्यावरील व्याज देण्यात येणार आहे. यासंदर्भातील कार्यवाही पूर्ण करण्यासाठी ३१  मार्च २०२०  पर्यंत मुदत देण्यात आल्यामुळे जास्तीत जास्त पात्र शेतकरी फायदा घेऊ शकतात अशी माहीती किशोर तिवारी यांनी दिली 
=======================================


No comments: