Monday, June 10, 2019

उद्धव ठाकरे यांनी पीक विमा कंपन्यांना सरळ करण्यापेक्षा पीकविमा योजनेला शेतकारी हिताची करण्याचा किशोर तिवारी यांचा सल्ला

उद्धव ठाकरे यांनी पीक विमा कंपन्यांना सरळ करण्यापेक्षा पीकविमा योजनेला शेतकारी हिताची करण्याचा किशोर तिवारी यांचा सल्ला 
दिनांक -१० जुन २०१९
शिवसेनेच्या वतीने जालना तालुक्यातील साळेगाव येथील चारा छावणीत गुरे आणलेल्या शेतक ऱ्यांना आवश्यक वस्तूंचे वितरण करण्यासाठी आयोजीत शेतकरी मेळाव्यात मागील खरीप हंगामात दुष्काळामुळे पिकांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले असतांनाही  विमा कंपन्या नुकसान भरपाई देण्यास तयार नसतील तर  या कंपन्यांना सरळ नाही तर वाकडे करून सोडतो, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या घोषणेचे स्वागत  कै वसंतराव नाईक शेती स्वालंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केले असुन मात्र या समस्येचे मूळ मस्तवाल विमा कंपन्यां नसुन मुळात त्रुटीपूर्ण पतंप्रधान पीकविमा योजनाच आहे कारण सध्याचे निकष व योजनेची रचनाच कारणीभुत असल्याचा आरोप करीत आज केंद्रीय पातळीवरील महायुतीत शिवसेना क्रमांक दोनचा पक्ष आहे त्यामुळे पीकविमा योजनेच्या सर्व त्रुटी दूर करण्याची मागणी सुद्धा किशोर तिवारी यांनी केली आहे . 
मागील पाच वर्षात पंतप्रधान पीकविमा योजनेच्या फायदा , विमा कंपन्यांना झाला आहे हे आता स्पष्ट होत आहे कारण सतत दुष्काळ व प्रचंड नापिकी झालेल्या वर्षात विमा कंपन्यांना सुमारे ३० हजार कोटींचा निव्वळ नफा झालाच कसा असा प्रश्न उपस्थित करीत किशोर तिवारीं यांनी सरकारने ज्या तालुक्यात १०० टक्के दुष्काळ जाहीर केला व नुकसान भरपाई सुद्धा दिली असतांना त्याच भागात पीकविमा कंपन्यांनी या खेड्यातील फक्त १० टक्के निवडक शेतकऱ्यांना निवडक पिकांसाठी पीकविमा दिला आहे ही बाब शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समोर आणली असुन शेतक ऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी या योजनेतील त्रुटी व सुधारणेसाठी  महायुतीत संघर्ष करण्याची वेळ आली असल्याची प्रतिपादन तिवारीं यांनी यावेळी केले . 
पंतप्रधान पीकविमा योजनेमध्ये  सध्या खाजगी व सरकारी व्यावसायिक पीकविमा  कंपन्यांचा एकाधिकार आहे महाराष्ट्रात हि योजना ब्लॉक स्तरावर आहे ती गाव स्तरावर असणे गरजेचे आहे ,सर्वात जास्त आर्थिक नुकसान करणारी नगदी पीक नेमकी पिकविम्याबाहेर ठेवण्यात येत आहे . उंबरठयाचे पीक मोजण्याचे निकष पीकविमा  कंपन्यांचा मर्जीने काढण्यात येत आहे ,पीक कापणीचे अहवाल नेमके संपूर्ण ४० गावाच्या ब्लॉकमध्ये चांगल्या पिकाच्या शेतात कोणतीही सूचना ग्रामसभांना न देता गुपचुप घेण्यात येतात व पिकविम्याचा लाभ मात्र विमा कंपन्या मर्जीने करतात असा अनुभव आहे यात ग्रामसभेचा अधिकार स्थापित करण्याची गरजेवर  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काम करण्याची विनंती किशोर तिवारी यांनी केली आहे . 
पंतप्रधान पीकविमा योजनेसाठी सरकारने सर्व खाजगी विमा कंपन्यांचा व सरकारच्या नियंत्रणातील व्यावसायिक विमा  कंपन्यांचा सहभाग बंद करावा व पिकविम्यासाठी केंद्र-राज्य सरकारचा शेतकऱ्यांचा ना नफा ना तोटा तत्वावर सध्याचे सरळ अनुदान दुप्पट करीत शेतकरी स्तरावर ग्रामसभेच्या सहभागाने लागू करण्यासाठी प्रयन्त करण्याची काळाची गरज असल्याचे प्रतिपादन किशोर तिवारी यांनी केली आहे . 
====================================================
======================

No comments: