Saturday, June 22, 2019

७० टक्के कर्जमाफीला प्राप्त शेतकऱ्यांची कर्जमाफीची रक्कम प्रलंबित - पहापळ ,पाटणबोरी झरी येथील मेळाव्यात समोर आले सत्य

७० टक्के कर्जमाफीला प्राप्त  शेतकऱ्यांची कर्जमाफीची रक्कम प्रलंबित - पहापळ ,पाटणबोरी झरी येथील मेळाव्यात  समोर आले सत्य 
 दिनांक २२ जुन २०१९ 
वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी १९ जूनपासून सुरु केलेल्या पिककर्ज मेळाव्यात बँकांनी आज पर्यंत ७० टक्के शेतकऱ्यांनी पिककर्ज माफीची रक्कम मागील २४ महिन्यापासून आली नसुन जी आली ती १५ टप्प्यात आली ग्रीनं यादीच्या नावावर आली मात्र मागील ४ महिन्यापासून ग्रीनं यादी येणे बंद झाल्याचे बँक ऑफ महाराष्ट्र पहापळ झरी व स्टेट बँक पाटणबोरी येथील बँकेच्या शाखा समोरील हजारो शेतकऱ्यांनी तक्रारी आणली तर सरकारी बँकांनी मागील वर्षी ज्या शेतकऱ्यांना पीककर्ज दिले होते त्यांना दुष्काळ पडला असल्यामुळे  पुनर्गठन करणे सुरु न केल्यामुळे फक्त १० ते १५ टक्केच वाटप झाल्याचे सत्य समोर आले यावेळी पाटणबोरी येथे शेतकऱ्यांचा प्रचंड असंतोषाचा सामना किशोर तिवारी यांना करावा लागला असुन आता दोन वर्षानंतर  पीककर्जमाफ़ीची रक्कम आली तरी त्यावरील व्याज कोण भरणार या वाद असल्याने शेतकऱ्यांना बँकाच्या दारावर पाय घासत बसावे लागत आहेत अशी भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे . 
पाटणबोरी पिककर्ज मेळाव्यात किशोर तिवारी यांनी या असंतोषाला महाराष्ट्राचे निकामी सहकार व आई टी विभागाचे अधिकारी असुन विषयाचे गांभीर्य पश्चिम महाराष्ट्राच्या सहकारमंत्र्याला नसल्याने शेतकरी आत्महत्या करीत असल्याची खंत व्यक्त करीत आपण अडचणीत सापडलेल्या शेतक-यांना खरीप हंगामासाठी सर्व बँकांनी १०० टक्के शेतक-यांना १५ जुन पूर्वी कर्ज उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्याचे वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी दिलेले निर्देश सर्व सरकारी बँकांनी केराच्या टोपलीत टाकले असुन याला संपूर्णपने राज्यस्तरीय पतपुरवडा देण्याऱ्या  बँकांची समीती म्हणजे एस.  एल . बी . सी . जबाबदार असल्याचा गंभीर आरोप किशोर तिवारी करीत राज्यस्तरीय पतपुरवडा देण्याऱ्या  बँकांची समीती अध्यक्ष अग्रीम बँकेच्या महासंचालकाकडे न  देता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे देण्याची मागणी केली .  
बँकासोबतच महाराष्ट्र सरकारचे अधिकारी व कर्मचारी सुद्धा झोपा  काढत  असल्याची टीका करीत त्यांनीसुद्धा शेतक-यांच्या याद्या, तसेच सातबारा व आठ अ कागदपत्रे आजपर्यंत  उपलब्ध करून दिले नाही वा एकही पिककर्ज मेळावा घेतला नाही मागीलवर्षी सुद्धा शेतक-यांना खरीप हंगामासाठी मागील वर्षी केवळ ३० टक्के शेतक-यांना पीककर्ज उपलब्ध करून देण्यात आले होते. परंतु यावर्षी १०० टक्के शेतक-यांना खरीपासाठी पीक कर्ज उपलब्ध करून देण्याचे नियोजन करावे, अशी सूचना  किशोर तिवारी यांनी १३ मेला केली होता मात्र उदासीन बँका व प्रशासनाने हे सर्व कठीण केले आहे अशी खंत किशोर तिवारी यांनी व्यक्त केली आहे कारण  शासनाने पीककर्जाचे पुनर्गठन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय  घेतला असताना राष्ट्रीयकृत बँकांनी आवडेश आले नाही असे कारण सांगत पुनर्गठन केले नसल्याच्या दुष्काळग्रस्त विदर्भ व मराठवाड्यातुन येत आहेत मात्र सर्व मंत्री व सनदी अधिकारी वातानुकूलित चेंबरमध्ये आढावा घेत आहेत मात्र शेतकऱ्यांच्या दारावर जाऊन त्यांच्या अडचणी कोण समजणार असा सवाल किशोर तिवारी यांनी केला आहे . 
     
        किशोर तिवारी यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी शेतक-यांना पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी बँकांनी पूर्वतयारी करावी, यासाठी तालुकास्तरावर १५ मे पासून कर्ज मेळावे घेण्यात यावे त्याच बरोबर  ग्रामसभेमध्ये पीककर्जाचे पुनर्गठन व दुष्काळी परिस्थितीत राबविण्यात येणा-या विविध योजनांची माहिती ग्रामस्थ व शेतक-यांना द्यावी, अशी सूचना केली होती मात्र प्रशासन आज पर्यंत या कामाचा मुहूर्त पाहत असल्याची टीका तिवारी यांनी केली आहे कारण पीक कर्जाचे प्रमाण १०० टक्क्यांपर्यंत वाढविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्प आहे मात्र बँका या कामात  कुचराई करत आहेत  हि बाब चिंतेची आहे अशी खंत किशोर तिवारी यांनी यावेळी व्यक्त केली . 
==================================================================================================

===========

No comments: