पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांना जाब विचारण्यासाठी २० जूनला दारव्हा येथे मेळावा
दिनांक १९ जुन २०१९
अडचणीत सापडलेल्या शेतक-यांना खरीप हंगामासाठी सर्व बँकांनी १०० टक्के शेतक-यांना १५ जुन पूर्वी कर्ज उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्याचे संतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी दिलेले निर्देश सर्व सरकारी बँकांनी केराच्या टोपलीत टाकले असुन याला संपूर्णपने राज्यस्तरीय पतपुरवडा देण्याऱ्या बँकांची समीती म्हणजे एस. एल . बी . सी .चे शेतकरी विरोधी धोरण जबाबदार असल्याचा गंभीर आरोप किशोर तिवारी केला असून सरकारच्या आदेशाना केराची टोपली दाखविणाऱ्या बँकाच्या मस्तवाल अधिकाऱ्यांविरुद्ध आता २० जून रोजी दारव्हा येथील निधी मंगल कार्यालयामध्ये दुपारी दोन वाजता श्री किशोर जी तिवारी अध्यक्ष वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशन-यांचे प्रमुख उपस्थितीत शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी पिक कर्ज मेळावा आयोजित करण्यात आला आहे या मेळाव्यात लोही स्टेट बँक, चिखली स्टेट बँक, धामणगाव देव स्टेट बँक,दारव्हा स्टेट बँक, दारव्हा सेंट्रल बँक, दारव्हा बँक ऑफ इंडिया, दारव्हा ग्रामीण बँक, दारव्हा कॉपरेटिव बँक, तसेच बोरी स्टेट बँक, लाडखेड सेंट्रल बँक आणि नेर तालुक्यातील सर्व बँकांच्या बँकांचे मॅनेजर तसेच दारव्हा येथील तहसीलदार श्री.शेलार साहेब कृषी अधिकारी श्री.भरणे साहेब विद्युत विभागाचे अधिकारी श्री.दुपारे साहेब उपस्थित राहणार असून या मेळाव्यात शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्या मध्ये विनाकारण तांत्रिक अडचणी निर्माण करण्यात आल्या असल्यास त्या दूर करण्यात येईल तसेच ज्या शेतकऱ्यांना अजून कर्जमाफी प्राप्त झालेली नाही त्यांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे अशी माहीती किशोर तिवारी यांनी आज दिली .
शासनाने पीककर्जाचे पुनर्गठन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असताना राष्ट्रीयकृत बँकांनी आदेशच आले नाही असे कारण सांगत पुनर्गठन केले नसल्याच्या दुष्काळग्रस्त विदर्भ व मराठवाड्यातुन येत आहेत मात्र सर्व मंत्री व सनदी अधिकारी वातानुकूलित चेंबरमध्ये आढावा घेत आहेत मात्र शेतकऱ्यांच्या दारावर जाऊन त्यांच्या अडचणी कोण समजणार असा सवाल किशोर तिवारी यांनी केला आहे ,
किशोर तिवारी यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी शेतक-यांना पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी बँकांनी पूर्वतयारी करावी, यासाठी तालुकास्तरावर १५ मे पासून कर्ज मेळावे घेण्यात यावे त्याच बरोबर ग्रामसभेमध्ये पीककर्जाचे पुनर्गठन व दुष्काळी परिस्थितीत राबविण्यात येणा-या विविध योजनांची माहिती ग्रामस्थ व शेतक-यांना द्यावी, अशी सूचना केली होती मात्र प्रशासन आज पर्यंत या कामाचा मुहूर्त पाहत असल्याची टीका तिवारी यांनी केली आहे कारण पीक कर्जाचे प्रमाण १०० टक्क्यांपर्यंत वाढविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्प आहे मात्र बँका या कामात कुचराई करत आहेत हि बाब चिंतेची आहे अशी खंत किशोर तिवारी यांनी यावेळी व्यक्त केली मात्र आता मस्तवाल बँकांना आम्ही सरळ करणार असा निर्धार करीत ही मोहीम १९ जूनपासून सुरु असुन आता २० जून रोजी दारव्हा येथील निधी मंगल कार्यालयामध्ये दुपारी दोन वाजता श्री किशोर जी तिवारी अध्यक्ष वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशन-यांचे प्रमुख उपस्थितीत शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी पिक कर्ज मेळावा आयोजित करण्यात आला आहे या मेळाव्यात लोही स्टेट बँक, चिखली स्टेट बँक, धामणगाव देव स्टेट बँक,दारव्हा स्टेट बँक, दारव्हा सेंट्रल बँक, दारव्हा बँक ऑफ इंडिया, दारव्हा ग्रामीण बँक, दारव्हा कॉपरेटिव बँक, तसेच बोरी स्टेट बँक, लाडखेड सेंट्रल बँक आणि नेर तालुक्यातील सर्व बँकांच्या आढावा घेण्यात येणार आहे कारण सरकारने शेतकऱ्यांवरील थकीत झालेले २००१ पासुन जून २०१६पर्यंतचे सर्व पिक कर्ज व सर्व मध्यम मुदतीचे शेतीसाठी घेतलेले दीड लाखपर्यंतचे थकीत कर्जाची रक्कम बँकांना दिले असुन आता आजच्या हेक्टरी पत मर्यादेप्रमाणे पिक कर्ज वाटप करणे अत्यंत आवश्यक असल्यामुळे " मागेल त्याला पीककर्ज " योजना सुरु करण्यात आली असुन सर्व शेतकऱ्यांना सरकारला दिलेल्या सवलती प्रमाणे फायदा देऊन नवीन पत पुरवडा कराण्यासाठी हे मेळावे घेण्यात येत आहेत या मेळाव्याची व्यवस्था व पिक कर्ज वाटपामधील कुचराई करण्याऱ्या व कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याच्या सूचना सचिवांनी दिल्या आहेत त्यानुसार कारवाई विनाविलंब करण्यात येईल अशी तंबीही किशोर तिवारी यांनी दिली आहे
या मेळाव्यास डॉ. प्रा. अजय दुबे, श्री अंबादास जाधव, श्री जानू सिंग राठोड,श्री सुधीर भाऊ अलोने शिवसेनेचे श्री. श्रीधर मोहड विरोधी पक्षनेते जिल्हा परिषद यवतमाळ,श्री. मनोज जी सिंगी तालुकाध्यक्ष शिवसेना, श्री दत्ताभाऊ राहणे तालुकाध्यक्ष भाजपा, जिल्हा परिषद सदस्य श्री. कुडसंगे,पंचायत समिती सभापती सौ.चव्हाण उपसभापती राऊत,नगराध्यक्ष श्री.बबनराव इरवे, श्री बलखंडे शहराध्यक्ष भाजपा.उपस्थित राहणार असून शेतकऱ्यांनी आपले शेती संबंधीचे सर्व प्रश्न या ठिकाणी अधिकाऱ्यांच्या समोर मांडून सोडवून घ्यावे असे आव्हान प्रा.अजय दुबे यांनी शेतकऱ्यांना केले आहे.
No comments:
Post a Comment