Monday, June 17, 2019

पीककर्ज वाटपात शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्यांवर बँकांना जाब विचारण्यासाठी १९ जूनला पहापळ ,पाटणबोरी झरी येथे शेतकरी एल्गार मेळावे

पीककर्ज वाटपात शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्यांवर बँकांना जाब विचारण्यासाठी १९ जूनला पहापळ ,पाटणबोरी झरी येथे शेतकरी एल्गार मेळावे 
 दिनांक १८ जून २०१९
अडचणीत सापडलेल्या शेतक-यांना खरीप हंगामासाठी सर्व बँकांनी १०० टक्के शेतक-यांना १५ जुन पूर्वी कर्ज उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्याचे संतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी दिलेले निर्देश सर्व सरकारी बँकांनी केराच्या टोपलीत टाकले असुन याला संपूर्णपने राज्यस्तरीय पतपुरवडा देण्याऱ्या  बँकांची समीती म्हणजे एस.  एल . बी . सी .चे शेतकरी विरोधी धोरण  जबाबदार असल्याचा गंभीर आरोप किशोर तिवारी केला असून सरकारच्या आदेशाना केराची टोपली दाखविणाऱ्या बँकाच्या मस्तवाल अधिकाऱ्यांविरुद्ध आता १९ जुन पासुन  पहापळ ,पाटणबोरी झरी येथे शेतकरी एल्गार मेळाव्यात    आपल्या अधिकाराची व हक्काची लढाई   असल्याची माहीती किशोर तिवारी यांनी आज दिली 
यावेळी बँकासोबतच महाराष्ट्र सरकारचे अधिकारी व कर्मचारी सुद्धा झोपा  काढत  असल्याची टीका करीत त्यांनीसुद्धा शेतक-यांच्या याद्या, तसेच सातबारा व आठ अ कागदपत्रे आजपर्यंत  उपलब्ध करून दिले नाही वा एकही पिककर्ज मेळावा घेतला नाही मागीलवर्षी सुद्धा शेतक-यांना खरीप हंगामासाठी मागील वर्षी केवळ ३० टक्के शेतक-यांना पीककर्ज उपलब्ध करून देण्यात आले होते. परंतु यावर्षी १०० टक्के शेतक-यांना खरीपासाठी पीक कर्ज उपलब्ध करून देण्याचे नियोजन करावे, अशी सूचना  किशोर तिवारी यांनी १३ मेला केली होता मात्र उदासीन बँका व प्रशासनाने हे सर्व कठीण केले आहे अशी खंत किशोर तिवारी यांनी व्यक्त केली आहे कारण  शासनाने पीककर्जाचे पुनर्गठन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय  घेतला असताना राष्ट्रीयकृत बँकांनी आदेशच  आले नाही असे कारण सांगत पुनर्गठन केले नसल्याच्या दुष्काळग्रस्त विदर्भ व मराठवाड्यातुन येत आहेत मात्र सर्व मंत्री व सनदी अधिकारी वातानुकूलित चेंबरमध्ये आढावा घेत आहेत मात्र शेतकऱ्यांच्या दारावर जाऊन त्यांच्या अडचणी कोण समजणार असा सवाल किशोर तिवारी यांनी केला आहे   ,
    किशोर तिवारी यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी शेतक-यांना पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी बँकांनी पूर्वतयारी करावी, यासाठी तालुकास्तरावर १५ मे पासून कर्ज मेळावे घेण्यात यावे त्याच बरोबर  ग्रामसभेमध्ये पीककर्जाचे पुनर्गठन व दुष्काळी परिस्थितीत राबविण्यात येणा-या विविध योजनांची माहिती ग्रामस्थ व शेतक-यांना द्यावी, अशी सूचना केली होती मात्र प्रशासन आज पर्यंत या कामाचा मुहूर्त पाहत असल्याची टीका तिवारी यांनी केली आहे कारण पीक कर्जाचे प्रमाण १०० टक्क्यांपर्यंत वाढविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्प आहे मात्र बँका या कामात  कुचराई करत आहेत  हि बाब चिंतेची आहे अशी खंत किशोर तिवारी यांनी यावेळी व्यक्त केली मात्र आता मस्तवाल बँकांना आम्ही सरळ करणार असा निर्धार करीत ही मोहीम १९ जूनपासून सुरु करीत आहोत व १९ जूनला दुपारी १२ वाजता महाराष्ट्र बँक  पहापळ  व मध्यवर्ती सहकारी बँकेसमोर,दुपारी २ वाजता स्टेट  बँक ऑफ इंडिया  पाटणबोरी व मध्यवर्ती सहकारी बँकेसमोर , शेतकऱ्यांचा पीककर्ज तक्रारी निवारण मेळावा दुपारी ४  वाजता महाराष्ट्र बँक झरी व ग्रामीण बँक झरी व मध्यवर्ती सहकारी बँकेसमोर सरकारने शेतकऱ्यांवरील थकीत झालेले २००१ पासुन जून  २०१६पर्यंतचे सर्व पिक कर्ज व सर्व मध्यम मुदतीचे शेतीसाठी घेतलेले दीड लाखपर्यंतचे थकीत कर्जाची रक्कम बँकांना दिले असुन आता आजच्या  हेक्टरी पत मर्यादेप्रमाणे पिक कर्ज वाटप करणे अत्यंत आवश्यक असल्यामुळे  " मागेल त्याला पीककर्ज " योजना सुरु करण्यात आली असुन   सर्व शेतकऱ्यांना सरकारला दिलेल्या सवलती प्रमाणे फायदा देऊन नवीन पत पुरवडा कराण्यासाठी येत्या १९ जूनला अर्ज द्या व पीककर्ज घ्या  असे पीककर्ज मेळावे आयोजित करण्यात आले आहेत व या मेळाव्यासाठी  प्रशासनाकडुन नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आले असुन सर्व   बँकांनी कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांची यादी लावणे ,सरकारने कर्जमाफीची रक्कम जमा  केल्यांनंतर नव्याने पीककर्ज  देणे ,दुष्काळ घोषीत केल्यांनंतर थकीत पिक कर्जाचे पुनर्वसन  करणे,पीकविमा व अनुदानाची मदत पीककर्ज खात्यात जमा केली असल्यास या सर्व तक्रारींचे तात्काळ निवारण यावेळी करण्यात येणार आहे . ज्या शेतकऱ्यांना सहकारी सोसायट्या वा सहकारी बँक कर्जमाफी नंतर ना हरकत प्रमाणपत्र देत आहे त्यांना सरकारी बँकांनी तात्काळ पीककर्ज नव्याने द्यावे तसेच वन टाइम सेटलमेंट करनाऱ्या शेतकऱ्यांना नवीन पीककर्ज तात्काळ देण्यात यावे यासाठी या मेळाव्यात विषेय भर देण्यात येणार आहे . या  अर्ज द्या व पीककर्ज घ्या  असे पीककर्ज  मेळाव्यामध्ये शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी  १९ जूनला  खालील बँकांच्या शाखेत नियोजीत वेळेवर भेटी देणार आहेत यावेळी  तालुक्याचे तहसीलदार ,गट विकास अधिकारी व तालुका सहकार व कृषी अधिकाऱ्यांना सोबत असणे गरजेचे आहे . 
या मेळाव्याची व्यवस्था  व पिक कर्ज वाटपामधील कुचराई करण्याऱ्या व कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याच्या सूचना  सचिवांनी दिल्या आहेत त्यानुसार कारवाई विनाविलंब करण्यात येईल अशी तंबीही किशोर तिवारी यांनी दिली आहे . 

No comments: