Sunday, June 23, 2019

सर्व दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यात येणार -स्टेट बँकेचे मुख्य व्यवस्थापक इमियाज परवेज यांची दारव्हा येथील पीककर्ज मेळाव्यात घोषणा -सेन्ट्रल बँकेच्या मस्तवाल व्यस्थापकाला पोलिसांनी मेळाव्यात आणले -दुष्काळाचे अनुदानापासुन शेतकऱ्यांना वंचित तहसीलदाराला कारवाईचे निर्देश


सर्व दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यात येणार -स्टेट बँकेचे मुख्य व्यवस्थापक इमियाज परवेज यांची दारव्हा येथील पीककर्ज मेळाव्यात घोषणा -सेन्ट्रल बँकेच्या मस्तवाल व्यस्थापकाला पोलिसांनी मेळाव्यात आणले -दुष्काळाचे अनुदानापासुन शेतकऱ्यांना वंचित तहसीलदाराला कारवाईचे  निर्देश 
दिनांक २३ जुन २०१९ 
वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी १९ जूनपासून सुरु केलेल्या पिककर्ज मेळाव्यात २० जूनला दारव्हा येथे भाजपा नेते डॉ.अजय दुबे  यांनी आयोजीत पिककर्ज मेळाव्यात निधी मंगल कार्यालयात हजारो शेतकऱ्यांनी आपल्या  तक्रारीचा पाऊस पाडला व यवतमाळ जिल्हा अग्रिम बंकेंचे व्यवस्थापक तसेच जिल्हा उपनिबंधक यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश देऊनही दांडी मारल्याने तसेच शेतकऱ्यानां पीककर्ज नाकारणारे व  पुनर्गठन करण्याचे आदेश आले नाही असे म्हणुन हाकलणारे सेंट्रल बँक दारव्हा येथील व्यवस्थापक यांनी यवतमाळ जिल्हा अग्रिम बंकेंचे व्यवस्थापक यांच्या अनुमतीने येत नाही असा निरोप दिल्याने वातावरण प्रचंड तापल्यानंतर स्टेट बँकेचे मुख्य व्यवस्थापक इमियाज परवेज यांनी सर्व शेतकऱ्यांना बँक कर्ज देणार अशी घोषणा केली व मेळाव्यातील शेतकऱ्यांना शांत केले . त्याचवेळी सेंट्रल बँक दारव्हा येथील व्यवस्थापक फक्त दलालामार्फत काम करतात व महाराष्ट्र सरकार काहीच वाकडे करू शकत नाही असे बोलत असतात व सेंट्रल बँकेने   पुनर्गठन करण्याचे आदेश दिले नाही असे सांगतात त्याच बरोबर अनुदानाची सेविंग खात्यात आलेली व इतर उत्पन्नातून आलेली मदत सुद्धा ब्लॉक करण्यात आल्याची तक्रार शेकडो शेतकऱ्यांनी केल्यावर सेंट्रल बँक दारव्हा येथील व्यवस्थापक यान समाधान करण्यासाठी येण्याची विनंती केली मात्र त्यांनी येत नाही म्हणून निरोप दिला त्यावेळी शेतकऱ्यांचा असंतोष कमी करण्यासाठी पोलिसांची गाडी पाठवून त्यांना आण्यात आले . 
या मेळाव्याला डॉ. प्रा. अजय दुबे, श्री अंबादास जाधव, श्री जानू सिंग राठोड,श्री सुधीर भाऊ अलोने शिवसेनेचे श्री. श्रीधर मोहड माजी विरोधी पक्षनेते जिल्हा परिषद यवतमाळ,‌श्री. मनोज जी सिंगी तालुकाध्यक्ष शिवसेना, श्री दत्ताभाऊ राहणे तालुकाध्यक्ष भाजपा, जिल्हा परिषद सदस्य श्री. कुडसंगे,पंचायत समिती सभापती सौ.चव्हाण उपसभापती राऊत,नगराध्यक्ष श्री.बबनराव इरवे, श्री बलखंडे शहराध्यक्ष भाजपा.उपस्थित होते . 
यावेळी  डॉ. प्रा. अजय दुबे म्हणाले की बँकांनी आज पर्यंत ७० टक्के शेतकऱ्यांनी पिककर्ज माफीची रक्कम मागील २४ महिन्यापासून आली नसुन तसेच  सरकारी बँकांनी मागील वर्षी ज्या शेतकऱ्यांना पीककर्ज दिले होते त्यांना दुष्काळ पडला असल्यामुळे  पुनर्गठन करणे सुरु न केल्यामुळे फक्त १० ते १५ टक्केच वाटप झाल्याचे सत्य समोर आले आता दोन वर्षानंतर  पीककर्जमाफ़ीची रक्कम आली तरी त्यावरील व्याज कोण भरणार या वाद असल्याने शेतकऱ्यांना बँकाच्या दारावर पाय घासत बसावे लागत आहेत अशी भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे . 
दुष्काळाचे अनुदानापासुन शेतकऱ्यांना वंचित तहसीलदाराला कारवाईचे  निर्देश 
        दारव्हाचे तहसीलदार शेलार यांनी दुष्काळग्रस्तांना सरकारचे आलेले अनुदान आजपर्यंत न दिल्यामुळे किशोर तिवारी यांचा पारा सटकला व त्यांनी सरळ मुख्य सचिवांना माहिती दिली व मुख्य सचिवांनी त्यांचेवर  तात्काळ कारवाईचे आश्वासन दिले व तसा सूचना उपविभागीय अधिकारी इब्राहीम चौधरी याना यावेळी किशोर तिवारी यांनी दिले . किशोर तिवारी यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी शेतक-यांना पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी बँकांनी पूर्वतयारी करावी, यासाठी तालुकास्तरावर १५ मे पासून कर्ज मेळावे घेण्यात यावे त्याच बरोबर  ग्रामसभेमध्ये पीककर्जाचे पुनर्गठन व दुष्काळी परिस्थितीत राबविण्यात येणा-या विविध योजनांची माहिती ग्रामस्थ व शेतक-यांना द्यावी, अशी सूचना केली होती मात्र प्रशासन आज पर्यंत या कामाचा मुहूर्त पाहत असल्याची टीका तिवारी यांनी केली आहे कारण पीक कर्जाचे प्रमाण १०० टक्क्यांपर्यंत वाढविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्प आहे मात्र बँका या कामात  कुचराई करत आहेत  हि बाब चिंतेची आहे अशी खंत किशोर तिवारी यांनी यावेळी व्यक्त केली . 
==================================================================================================

No comments: