Sunday, June 2, 2019

'मागेल त्याला पीक कर्ज' या १०० टक्के शेतक-यांना १५ जुन पूर्वी पीककर्ज वाटप करण्याच्या आदेशाला बँकांनी लावला चुना - कर्जबाजारी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे पेरणीच्या चिंतेने आत्महत्या सत्र सुरु -किशोर तिवारी


'मागेल त्याला पीक कर्ज' या  १०० टक्के शेतक-यांना १५ जुन पूर्वी पीककर्ज वाटप करण्याच्या आदेशाला बँकांनी लावला चुना  - कर्जबाजारी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे पेरणीच्या चिंतेने आत्महत्या सत्र सुरु -किशोर तिवारी

 दिनांक ३ जुन २०१९ 
अडचणीत सापडलेल्या शेतक-यांना खरीप हंगामासाठी सर्व बँकांनी १०० टक्के शेतक-यांना १५ जुन पूर्वी कर्ज उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्याचे संतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी दिलेले निर्देश सर्व सरकारी बँकांनी केराच्या टोपलीत टाकले असुन याला संपूर्णपने राज्यस्तरीय पतपुरवडा देण्याऱ्या  बँकांची समीती म्हणजे एस.  एल . बी . सी . जबाबदार असल्याचा गंभीर आरोप किशोर तिवारी करीत राज्यस्तरीय पतपुरवडा देण्याऱ्या  बँकांची समीती अध्यक्ष अग्रीम बँकेच्या महासंचालकाकडे न  देता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे देण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे रेटली आहे .  
बँकासोबतच महाराष्ट्र सरकारचे अधिकारी व कर्मचारी सुद्धा झोपा  काढत  असल्याची टीका करीत त्यांनीसुद्धा शेतक-यांच्या याद्या, तसेच सातबारा व आठ अ कागदपत्रे आजपर्यंत  उपलब्ध करून दिले नाही वा एकही पिककर्ज मेळावा घेतला नाही मागीलवर्षी सुद्धा शेतक-यांना खरीप हंगामासाठी मागील वर्षी केवळ ३० टक्के शेतक-यांना पीककर्ज उपलब्ध करून देण्यात आले होते. परंतु यावर्षी १०० टक्के शेतक-यांना खरीपासाठी पीक कर्ज उपलब्ध करून देण्याचे नियोजन करावे, अशी सूचना  किशोर तिवारी यांनी १३ मेला केली होता मात्र उदासीन बँका व प्रशासनाने हे सर्व कठीण केले आहे अशी खंत किशोर तिवारी यांनी व्यक्त केली आहे कारण  शासनाने पीककर्जाचे पुनर्गठन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय  घेतला असताना राष्ट्रीयकृत बँकांनी आवडेश आले नाही असे कारण सांगत पुनर्गठन केले नसल्याच्या दुष्काळग्रस्त विदर्भ व मराठवाड्यातुन येत आहेत मात्र सर्व मंत्री व सनदी अधिकारी वातानुकूलित चेंबरमध्ये आढावा घेत आहेत मात्र शेतकऱ्यांच्या दारावर जाऊन त्यांच्या अडचणी कोण समजणार असा सवाल किशोर तिवारी यांनी केला आहे . 
     
        किशोर तिवारी यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी शेतक-यांना पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी बँकांनी पूर्वतयारी करावी, यासाठी तालुकास्तरावर १५ मे पासून कर्ज मेळावे घेण्यात यावे त्याच बरोबर  ग्रामसभेमध्ये पीककर्जाचे पुनर्गठन व दुष्काळी परिस्थितीत राबविण्यात येणा-या विविध योजनांची माहिती ग्रामस्थ व शेतक-यांना द्यावी, अशी सूचना केली होती मात्र प्रशासन आज पर्यंत या कामाचा मुहूर्त पाहत असल्याची टीका तिवारी यांनी केली आहे कारण पीक कर्जाचे प्रमाण १०० टक्क्यांपर्यंत वाढविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्प आहे मात्र बँका या कामात  कुचराई करत आहेत  हि बाब चिंतेची आहे अशी खंत किशोर तिवारी यांनी यावेळी व्यक्त केली . 
==================================================================================================
===========

No comments: