जबरीने बी टी वांगी वा राउंडअप तणनाशक निरोधक बी जि ३ पेरण्याच्या धमकीने ग्रामीण भागातील पर्यावरण व आरोग्य धोक्यात -किशोर तिवारी
दिनांक - ९ जुन २०१९
'हे सरकार आम्हाला जगाशी स्पर्धा करू देत नाही', असा नारा देत शेतकरी संघटनेने प्रचंड बहुमताने लोकांनी निवडलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदीप्रणित भाजप सरकारच्या विरोधात जबरीने बी टी वांगी वा राउंडअप तणनाशक निरोधक बी जि ३ पेरण्याचे करण्याची घोषणा सरकारचे कायदे राजरोसपणे तोडण्याचा खुला प्रयन्त असुन हा सारा प्रकार त्रज्ञान देणाऱ्या बहुराष्ट्रीय कंपन्याच्या शेतकरी नेत्यांना सुपारी देऊन करण्यात येत असुन यामुळे ग्रामीण भागातील पर्यावरण व आरोग्य धोक्यात येण्याची भीती कै वसंतराव नाईक शेती स्वालंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी व्यक्त केली असुन कारण नुकताच तणनाशक निरोधंकं बियाणे व तणनाशकाचा अति वापरामुळे कर्करोग झाल्याचे आरोप करीत नुकसान भरपाईचा दावा अमेरीकेच्या न्यायालयाने मंजूर केल्याने पुन्हा एकदा पर्यावरण व आरोग्याचा मुद्दा ऐरणीवर आला असल्यामुळे या गंभीर विषयावर सरकारने शेतकरी ,पर्यावरणवादी ,कृषी तंत्रज्ञान देणाऱ्या बहुराष्ट्रीय कंपन्यासह जागतीक स्वास्थ संस्था तसेच निरी यांच्या कृषी विद्यापीठासोबत खुली चर्चा करूनच अंतिम निर्णय घेण्याची सूचना सुद्धा सरकारला किशोर तिवारी यांनी केली आहे .
शेतकरी नेते शरद जोशी यांनी खुली बाजार व्यवस्था व बहुराष्ट्रीय कंपन्याचा खुले समर्थन ज्याप्रमाणे आपल्या अंतिम दिवसात केले होते त्याच पाऊलावर पाऊल टाकून त्यांची शेतकरी संघटनेचा आता आरोप करीत आहे की सरकार तणनाशक निरोधक बी टी ३ कापसाच्या बियाणाला कीटकनाशकाच्या लॉबीमुळे करीत आहे मात्र पर्यावरणवादी यांचा आरोप नवीन तंत्रज्ञान खुले करण्यासाठी शेजारी संघटनेचे आंदोलन ग्लाइफोसेट तणनाशक निर्मात्यांच्या फायद्यासाठी आहे हा विषय वादाचा असला तरी जगात ग्लाइफोसेटच्या वापरामुळे येणाऱ्या पिढ्यांमध्ये जैविक कार्यामध्ये व्यत्यय येतो यामुळे जन्म घेणाऱ्या संतानांना केवळ त्यांच्या पालकांच्या जनुकांचाच नव्हे तर इतर जनुकांच्या रेणूंनी त्या जीन्सवर रासायनिक क्रियाकलापांचा पर्यावरणीय घटक त्याच्या आयुष्यातला जीवनावर परिणाम करतात त्यामुळे अनेक जीवघेणे आजार होत असल्याचा दावा चिंतेचा विषय आहे म्हणून यावर किशोर तिवारी चिंतनाची मागणी केली आहे .
सध्या तणनाशक निरोधक बी टी ३ वा बोगस बी टी बियाणे शेतकरी मोठयाप्रमाणात विकत घेत आहेत व या बियाणांची निर्मिती गुजरातमध्ये राजरोसपणे होत आहे त्यावर कृषी विभाग राजकीय दबावाखाली चूप आहे मात्र हे अनधिकृत बीटी बियाणे शेतकऱ्यांनी वापरल्यास ५ वर्षं तुरूंगवास व १ लाख रुपये दंड करण्याची धमकी तोच कृषीविभाग देतो यावर किशोर तिवारी आपली संपुर्ण नाराजी सरकारला कळविली आहे बियाण्यांचे नवीन तंत्रज्ञान सरकारने आरोग्याला व पर्यावरणाला घातक नाही याची हमी देत अमेरिकेसारखे अनुदान देऊन सरळवाणामध्ये उपलब्ध करावे त्यामुळे बहुराष्ट्रीय कंपन्याचा एकाधिकार बियांनाच्या क्षेत्रात बी टी कापसाच्या बियाणासारखा होणार नाही असे सुचविले आहे .
तणनाशकांच्या वापरामुळे कर्करोगाची लागण होते हे सध्या वादग्रस्त आहें कारण वेगवेगळ्या पॅनल्स वेगवेगळ्या प्रक्रिया वापरून आपली भिन्न मते देतात वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचा भाग असलेल्या कर्करोगाने आंतरराष्ट्रीय शोध संस्थेने 2015 मध्ये असे सांगितले की ग्लायफोसेट ही कर्करोगाची लागण होते म्हटले आहे परंतु यू.एस. पर्यावरण संरक्षण एजन्सी आणि युरोपियन खाद्य सुरक्षा प्राधिकरणानेही हे नाकारले आहे आता शेकऱ्यांनी आरोग्याची व पर्यावरणाची चिंता करावी व मात्र सरकार तसेच समाजाने बघ्याची भूमिका घ्यावी हे बरोबर नसल्याचे मत किशोर तिवारी व्यक्त केले आहे .
====================================================
No comments:
Post a Comment